एकनाथ शिंदेंवर अनेक जणांचा विश्वास
आता झालेली ही बंडखोरी लोकांमुळे आणि शिवसेना वाचवण्यासाठी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बंडखोरीमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, आता आमच्यासोबत असलेली ही सेना खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीतून फुटून ज्या ज्या आमदारांनी आम्हाल साथ दिली आहे, त्यांना एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास होता म्हणून ते शिंदे गटात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.विधानसभेच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी शिवसेना-भाजप युती होती, त्यामुळेच लोकांनी युतीला साथ देऊन आमदार संजय शिरसाठसारख्या सेनेच्या आमदारांना मतदारांनी निवडून दिले. मात्र त्यानंतर जी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली त्यामध्ये लोकप्रतिनिधींची घुसमट झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आता झालेली ही बंडखोरी लोकांमुळे आणि शिवसेना वाचवण्यासाठी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बंडखोरीमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, आता आमच्यासोबत असलेली ही सेना खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Published on: Aug 01, 2022 10:14 AM
