Delhi Lal Quila Blast : लाल किल्ला 26 जानेवारीला अतिरेक्यांच्या टार्गेटवर… हादरवणाऱ्या CCTVसह धक्कादायक खुलासे समोर
फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले असून, अजूनही 300 किलो स्फोटके गायब आहेत. दिल्ली स्फोटामागे डॉक्टर मॉड्यूल असून, जैश-ए-मोहम्मदने जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवला. 26 जानेवारी रोजी लाल किल्ला अतिरेक्यांच्या निशाण्यावर होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले असून, अजूनही 300 किलो स्फोटके गायब असल्याचा शोध सुरू आहे. अतिरेकी डॉक्टर मॉड्यूल दोन वर्षांपासून स्फोटके जमा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या मॉड्यूलमध्ये डॉ. मुजम्मिल आणि डॉ. आदिल यांचा समावेश आहे. या तपासात 26 जानेवारी रोजी दिल्लीतील लाल किल्ला अतिरेक्यांच्या निशाण्यावर होता, अशी माहिती डॉ. मुजम्मिलच्या मोबाईलमधून उघड झाली आहे. जानेवारी महिन्यात लाल किल्ल्याची रेकी करण्यात आली होती, मात्र कडेकोट बंदोबस्तामुळे हा कट यशस्वी होऊ शकला नाही. दिल्लीतील स्फोट जैश-ए-मोहम्मदने त्यांचे बहावलपूरमधील मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी घडवला होता. या कटाचे धागेदोरे तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले आहेत.
Published on: Nov 12, 2025 09:55 PM
