रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र ‘या’ नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण…

रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र ‘या’ नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण…

| Updated on: Aug 11, 2026 | 11:20 AM

शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखाणी यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम दिल्लीत पार पडला. या सोहळ्याला देशातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, पवार कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्ती या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने चर्चांना सुरुवात झाली.

रेवती आणि सारंग यांच्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 20 मिनिटे रिसेप्शनमध्ये होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासोबत काही वेळ संवाद साधला. पवार कुटुंबासोबत नरेंद्र मोदी यांनी फोटोही काढला.

मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिसेप्शनला उपस्थित नव्हत्या. त्यांच्या गैरहजेरीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विशेष म्हणजे पार्थ पवार आणि जय पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

दरम्यान, अमित शाह यांनीही रेवती आणि सारंग यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी आणि अमित शाह एकाच वेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असल्याचेही दिसून आले. सुप्रिया सुळे पाहुण्यांचे स्वागत करताना दिसल्या.

Published on: Aug 11, 2026 11:20 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us