एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?

एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?

| Updated on: Nov 19, 2026 | 5:01 PM

महापौर रितू तावडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. त्या म्हणाल्या की, बाळासाहेब आमच्यासाठी वंदनीय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईचा कारभार चालतो. शायना एनसींबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापौर रितू तावडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अपमानाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बाळासाहेबांचा अपमान आम्हीही सहन करणार नाही,” असे तावडे यांनी ठामपणे नमूद केले. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केले. महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले की, बाळासाहेब ठाकरे हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत आणि त्यांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. त्या पुढे म्हणाल्या की, “मी काल सभागृहाच्या वतीने आणि समस्त मुंबईकरांच्या वतीने हेच सांगितले आहे की, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.” त्यांनी जोर देत सांगितले की बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या हृदयात आहेत आणि त्यांना ते नमन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आज संपूर्ण मुंबईचा कारभार चालू आहे, त्यामुळे ते कायम वंदनीय राहतील.

या संदर्भात, शायना एनसी यांच्याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील, असेही महापौर तावडे यांनी नमूद केले. शिंदे साहेब यावर नक्कीच भाष्य करतील किंवा आपल्या पक्षाच्या बाबतीत विचारविनिमय करतील असे त्या म्हणाल्या. कोणत्याही प्रकारची माहिती समोर येत असताना, हातातला पेपर पडताळून बघणे आणि छायाचित्रे तपासणे तितकेच महत्त्वाचे आहे असे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Nov 19, 2026 5:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us