तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात रोहित पवार नाराज? महत्त्वाच्या बैठकीतच…
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोन्ही बडे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवर त्यांची नाराजी आहे. या दोन्ही नेत्यांना पक्षात डावलले जात असल्याचा संदेश गेला. यानंतर तटकरे आणि पटेलांनी शरद पवारांची भेट घेतली आणि इथेच घोळ झाला, अशी सूत्रांची माहिती आहे.

आता शरदचंद्र पवार यांच्या पक्षात नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार आहे, पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित असतील. ते पुण्यामध्ये आहेत. या अनुपस्थितीवरून ते नाराज आहेत का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
तटकरेंच्या शरद पवारांना भेटीमुळे रोहित पवार हे त्यांचे आजोबा आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे, पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत आजी-माजी आमदार, प्रमुख नेते तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढे काही मोठं घडणार आहे की काय, असा प्रश्न उभा राहिला आहे.