Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे

Rohit Pawar | पेपर सेट करणाऱ्याचा प्रमुख आका कोण?; रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत मांडले धक्कादायक दावे

| Updated on: Jul 27, 2026 | 12:22 PM

एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करत, प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा दावा केला. तसेच, या आरोपांसंदर्भात आपल्याकडे पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले की, देशात आणि राज्यात सलग अनेक भरती व प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडत आहेत. “टीईटीचा पेपर एक दिवस आधी फुटला, नीटचा पेपर दोन दिवस आधी फुटला, एसआरपीएफ भरती परीक्षेतही पेपरफुटीचे आरोप झाले, एचएससी रसायनशास्त्राचा पेपरही परीक्षा होण्यापूर्वी बाहेर आला. आता एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत,” असं त्यांनी म्हटलं.

औषध निरीक्षकासारख्या महत्त्वाच्या पदासाठी पैशांच्या जोरावर निवड झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, “पैसे देऊन पेपर विकत घेणारी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करेल का? ती जनहितापेक्षा पैसे वसूल करण्याला प्राधान्य देईल. औषध निरीक्षकांवर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे.”

यावेळी त्यांनी नंदुरबारमधील एका अकादमीचा उल्लेख करत दावा केला की, 22 मार्च 2026 रोजी झालेल्या परीक्षेच्या दोन दिवस आधी, म्हणजे 20 मार्च रोजी काही उमेदवारांना व्हॉट्सअॅपद्वारे प्रश्न पाठवण्यात आले होते. हे प्रश्न काही मिनिटांत ‘डिलिट फॉर ऑल’ करण्यात आले, मात्र त्याआधी ते डाउनलोड करून इतरांना पाठवण्यात आल्याने त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत मूळ प्रश्नपत्रिका आणि कथित फुटलेल्या प्रश्नांची तुलना करत, 100 पैकी सुमारे 90 प्रश्न जुळत असल्याचा दावा केला. “नीट पेपरफुटीप्रमाणेच या प्रकरणातही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, यामागचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

Published on: Jul 27, 2026 12:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us