अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क… रोहित पवारांच्या पोस्टमुळे एकच खळबळ

| Updated on: May 10, 2026 | 5:56 PM

भोंदू अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. रोज या प्रकरणात अजूनही नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने भोंदुगिरी करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभर खळबळ उडवली आहे. रोज या प्रकरणात अजूनही नवनवे खुलासे होत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याने भोंदुगिरी करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. त्याचबरोबर त्यांने काही आर्थिक घोटाळेही केल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अशोक खरातचे काही राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचेही समोर आलेले आहे. तसेच इतरही नामांकित व्यक्ती खरातच्या संपर्कात होते हेही समोर आलेले आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी, ही विनंती.’

Published on: May 10, 2026 05:55 PM
Follow Us