Rohit Pawar | अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप; म्हणाले, सत्ताधारीच…
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं. संपूर्ण अधिवेशनात अजितदादांच्या अपघातावर चर्चा सरकार करूनच देणार नसेल, तर लोकांच्या मनात शंका निर्माण होईल की 100 टक्के कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती, मोठी संघटना किंवा कुठली तरी मोठी ताकद अजित दादांच्या अपघातामागे आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं. संपूर्ण अधिवेशनात अजितदादांच्या अपघातावर चर्चा सरकार करूनच देणार नसेल, तर लोकांच्या मनात शंका निर्माण होईल की 100 टक्के कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती, मोठी संघटना किंवा कुठली तरी मोठी ताकद अजित दादांच्या अपघातामागे आहे. या अपघाताची कुठेही चर्चा होऊ नये म्हणून सत्ताधारी दक्षता घेत आहेत, असा आरोपच रोहित पवार यांनी केला. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघातावरील राजकीय चर्चा तापलेली आहे. दरम्यान, या प्रकरणावर संसद आणि विधानसभेत चर्चाच होऊ दिली जात नसेल तर लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचे सर्व पुरावे माध्यमांसमोर मांडणार असल्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. विधानसभेप्रमाणेच संसदेतही अजितदादांच्या अपघातावर चर्चा होऊ दिली जात नसल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
