NCP | तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा… रोहित पवारांचे सूचक संकेत; शरद पवार-तटकरे भेटीमागे काय शिजतंय?

| Updated on: May 13, 2026 | 1:57 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षात अस्वस्थ असल्याचा दावा करत रोहित पवार यांनी मोठा राजकीय संकेत दिला आहे.

रोहित पवार म्हणाले, “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे अस्वस्थ आहेत, ही केवळ चर्चा नाही तर वास्तव आहे. पक्षाने त्यांना डिमोट केले आहे.” तसेच त्यांनी भाजपमधील काही नेत्यांनाही टोला लगावत, “तुम्ही भाजप सोडून या, आम्ही स्वागत करू,” असे वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही त्यांनी भाष्य करत, आमचा पक्ष भाजपसोबत विलीन होणार नाही असे रोहित पवार म्हणाले. सुनील तटकरे हे काल शरद पवार यांना भेटले. त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. तीन वर्षानंतर तटकरे हे पवारांना भेटल्याचे म्हटले जात आहे. या भेटीवर रोहित पवार यांनी भाष्य केले. “तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा,” असे म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. तटकरेंना त्यांच्या अध्यक्षांना काही मॅसेज द्यायचा असेल असे भाष्यही रोहित पवारांनी केले. 

Published on: May 13, 2026 01:57 PM
Follow Us