Parth Pawar Land Deal : आधी कागद दाखवा…पार्थ पवारांवरील ‘त्या’ आरोपांवर रूपाली ठोंबरे पाटलांचा वकिली मुद्दा, नेमकं काय म्हणाल्या?
पार्थ पवार यांच्या कथित कोरेगाव जमीन व्यवहारावर रुपाली ठोंबरे पाटलांनी पुरावे मागितले आहेत. १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना विकल्याचा आरोप असून, अंबादास दानवेंनी मनी लॉन्ड्रिंगची मागणी केली आहे. पुरावे असल्याशिवाय मी भाष्य करणार नाही, असे ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कथित कोरेगाव जमीन व्यवहारावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पुण्यातील कोरेगाव येथे ४० एकर जमीन १८०० कोटी रुपयांची असताना ती ३०० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप आहे. या कंपनीत पार्थ पवार संचालक असल्याचा दावा केला जात आहे.
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे की, अंबादास दानवे यांनी आधी पुरावे सादर करावेत. कागदपत्रे पाहिल्याशिवाय यावर भाष्य करणे योग्य नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या आरोपांवर मी बोलू शकत नाही. पार्थ पवार किंवा संबंधित कंपनीचे मालक स्वतः यावर भूमिका मांडतील. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित केले असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
