Saamana : ‘मिंधे गटाचे 35 आमदार गिळून भाजप ढेकर…, रवींद्र चव्हाणांनी सुपारी कातरायला घेतलीय’, सामनातून हल्लाबोल
सामना वृत्तपत्राने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे, ज्यात त्यांनी भाजप मिंधे गटातील किमान ३५ आमदार गिळून ढेकर देईल असे म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानावरून शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकारण सध्या विविध घडामोडींनी ढवळून निघाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रत्नागिरी येथील सभेची चर्चा असतानाच, सामना वृत्तपत्राने भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. सामनानुसार, भाजप मिंधे गटातील किमान ३५ आमदार गिळून ढेकर देईल असे म्हटले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नंबर दोन या विधानावरून सामनाने शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले असून, चव्हाण यांनी सुपारी कातरायला घेतली असेही सामनाने म्हटले आहे.
‘जोपर्यंत वर मोदी-शहा असे दोघे बसले आहेत, तोपर्यंत आमचा कोणी बालही वाकड़ा करणार नाही हा मिंधे गटाचा भ्रम आहे. मोदी-शहा व त्यांचा भाजप कोणाचाच नाही. हिंदुहृदयसम्राटांनी मोदी-शहांना प्रचंड मदत केली. ते हिंदुहृदयसम्राटांचे होऊ शकले नाहीत तेथे मिंधे कोण? दोन नंबरला खरेच काहीच किंमत नसते. त्यांचे बडबडणे आणि ऊर बड़वणे याला उकिरड्यावरचे कुत्रे विचारत नाही. नगरपालिका निवडणुकांनंतर महाराष्ट्रात बरेच काही घडेल. रवींद्र चव्हाणांनी सुपारी कातरायला घेतलीच आहे’, असे सामनातून म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.