Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश… आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश… आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

| Updated on: Jul 01, 2026 | 1:55 PM

राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. नुकतेच शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र विधान परिषदेतील महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता सचिन अहिर यांच्या विजयाची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला सर्वानुमते निवड करण्याचे आवाहन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यामुळे सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.

विशेष म्हणजे, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लगेचच सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि अवघ्या एका दिवसात त्यांची या महत्त्वाच्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

निवड जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात सचिन अहिर यांचे अभिनंदन केले. त्यांच्या निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या असून, आगामी काळात सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 01, 2026 1:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us