Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं

Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं

| Updated on: Jul 21, 2026 | 12:27 PM

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनकर्त्यांवर टीका करत त्यांनी त्यांची तुलना "आतंकवाद्यांशी" केली असून, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनकर्त्यांवर टीका करत त्यांनी त्यांची तुलना “आतंकवाद्यांशी” केली असून, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीला सरकारने लोकशाही मार्गाने उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यात आंदोलनकर्त्यांचा उल्लेख “आतंकवादी” असा करण्यात आल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीलाही विरोध केला. NEET पेपरफुटी प्रकरणात दोषींविरोधात कारवाई सुरू असून, चौकशीही सुरू आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सदाभाऊ खोत यांनी पुढे आरोप केला की, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आंदोलनाला अधिक चिथावणी दिली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांना “आतंकवादी” अशी उपमा दिल्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 21, 2026 12:27 PM
Follow Us