घोडेबाजार म्हणणं म्हणजे…, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना खोचक टोला

घोडेबाजार म्हणणं म्हणजे…, सदाभाऊ खोत यांचा विरोधकांना खोचक टोला

| Updated on: Jul 12, 2024 | 1:11 PM

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीला साद देण्याचा निर्णय राज्यातील बहुतांश आमदारांनी घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय महायुतीचा होणार असा विश्वास भाजप उमेदवार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. तर माध्यमांनी विचारलेल्या घोडेबाजाराच्या प्रश्नावरही सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले

सर्व लोकप्रतिनिधींवर आमचा विश्वास आहे. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीला साद देण्याचा निर्णय राज्यातील बहुतांश आमदारांनी घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजय महायुतीचा होणार असा विश्वास भाजप उमेदवार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. तर माध्यमांनी विचारलेल्या घोडेबाजाराच्या प्रश्नावरही सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. ‘घोडेबाजार चालला आहे असं म्हणणं म्हणजे आपल्याच लोकप्रतिनिधी आणि आमदारांवर दाखवलेला अविश्वास आहे आणि जे घोडेबाजार झालाय असा आरोप करातय ते घोड्यांच्या कळपात राहत असतील’, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना लगावला. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली. राज्यातील शेतकरी माझी उमेदवारी करत असल्याचेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Published on: Jul 12, 2024 01:11 PM