Nashik | नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिहंस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिहंस्थ कुंभमेळ्याची कामं चुकीच्या पद्धतीने होत आहे असा आरोप करण्यात आला आहे. नवीन अधिकाऱ्यांना परत पाठवून द्यावं आणि पूर्वीचे अनुभवी अधिकारी घेऊन यावे अशी मागणी साधू महंतांकडून करण्यात आली आहे.
नाशिकच्या सिहंस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिहंस्थ कुंभमेळ्याची कामं चुकीच्या पद्धतीने होत आहे असा आरोप करण्यात आला आहे. नवीन अधिकाऱ्यांना परत पाठवून द्यावं आणि पूर्वीचे अनुभवी अधिकारी घेऊन यावे अशी मागणी साधू महंतांकडून करण्यात आली आहे. कर्तृत्वशून्य लोकांना आणून ठेवल्याचा आरोप साधूंनी केला आहे. साधू समाजाला जर दुर्लक्षित केलं तर कुंभाचे परिणाम सगळयांना भोगावे लागतील असं देखील साधू म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर त्र्यंबकेश्वरला येऊन सर्व साधूंशी चर्चा करून सांत्वन करण्याची मागणी साधू महंतांकडून करण्यात येत आहे.
Published on: Jan 24, 2026 06:18 PM
