MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 16 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 16 June 2021

| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 5:02 PM

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली. सकाळी कोल्हापुरात मुक मोर्चाला सुरुवात झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता.

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी आंदोलनास सुरुवात झाली. मुक मोर्चाचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आंदोलनात येऊन संभाजीराजेंना पाठिंब्यांचं निवेदन दिलं. संभाजीराजेंनी आंदोलनावर ठाम असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. सरकारने चर्चेला बोलावल तरी आंदोलन होणारच असं संभाजीराजेनी यावेळी सांगितले.