Sanjay Raut : मला शिव्या देण्यासाठी 5-50 लाख खर्चे केले असतील… माझ्या नादाला लागू नका, राऊतांचा घणाघात कोणावर?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील आरोपांना पाठिंबा दर्शविला. त्यांनी आनंद दिघे यांच्यावर झालेल्या टीकेचा निषेध केला आणि शिवसेनेतील फूट आणि भाजपच्या भूमिकेवरून टीका केली. राऊत यांनी आरोप केला की, आंदोलनात त्यांना शिव्या देण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. राऊतांनी राहुल गांधी यांच्या निवडणूक आयोगावरील आरोपांना समर्थन दिलं. राहुल गांधी यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मतदार यादीतून नावे कशी काढली जातात याचे पुरावे सादर केल्यावर, राऊत यांनी भाजपावर तीव्र टीका केली. राऊतांमते, निवडणूक आयोग हे भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करत आहे. राऊत यांनी स्वतःवर आणि आनंद दिघे यांच्यावर झालेल्या टीकेचाही निषेध केला. त्यांनी दिघे यांच्यावर केलेल्या आरोपांना खोटे ठरवले आणि शिवसेनेतील फूट निर्माण करण्यासाठी या टीकेचा वापर होत असल्याचा आरोप केला. त्यांनी असा दावा केला की, शिंदे गट शिवसेनेच्या कालच्या आंदोलनात त्यांना शिव्या देण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.
Published on: Sep 19, 2025 01:30 PM
