Sanjay Raut On Dharavi | ‘गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मुंबईतील धारावी परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप करत धारावीतील मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे
मुंबईतील धारावी परिसरात सुरू असलेल्या तोडक कारवाईवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगपती गौतम अदानी आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप करत धारावीतील मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. धारावीमध्ये अनेक सामाजिक संस्था, व्यायामशाळा आणि मैदानांवर रात्रीच्या वेळी बुलडोझर चालवला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काही नगरसेवकांनी स्वतःच्या खर्चातून उभारलेल्या संस्था कोणतेही कारण नसताना तोडल्या जात आहेत. या संस्था नफा कमावण्यासाठी नसून स्थानिकांसाठी कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच धारावीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना धारावी वाचवण्यासाठी लढा देत असल्याचे सांगत राऊत यांनी प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले. म्हाडा आणि पोलीस कोणतीही जबाबदारी घेत नसल्याने हे प्रकार नेमके कोण करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
