जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले…

जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले…

| Updated on: Aug 20, 2026 | 11:35 AM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. जुन्नर आणि पुणे येथे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत, राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर डुप्लिकेट उपमुख्यमंत्री अशी टीका करत, राज्य सरकार महिला आरक्षण बिलावर लक्ष केंद्रित करत असताना, मुलींवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. “तुमच्याच राज्यात कोवळ्या मुलींवर अत्याचार सुरू आहेत, तरी सरकारला वेदना होत नाहीत का?” महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस आणि संजय राऊय यांच्या दावे-प्रतिदावे सुरु आहेत. अशात आता पुन्हा संजय राऊतांनी त्यांना सवाल केला आहे. त्यांनी सांगितलं, की इतर विषयांवर वहिनी बोलत असतात. दिल्लीला जाणार… नाही जाणार… मात्र या विषयांवर त्यांना वेदना होत नाहीत.? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयशी मुख्यमंत्री, पुणे शहरात बेकायदेशीरपणे कारभार सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या मते, राज्याचे नेतृत्व गंभीर मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करत आहे.

Published on: Aug 20, 2026 11:35 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us