‘ब्रँड’ला ‘ब्रँडी’नं उत्तर, राजकीय वातावरण गरम, फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार

‘ब्रँड’ला ‘ब्रँडी’नं उत्तर, राजकीय वातावरण गरम, फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार

| Updated on: Sep 19, 2025 | 10:27 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे ब्रँडवर केलेल्या टीकेला संजय राउतांनी तिखट प्रत्युत्तर दिलं. बेस्ट निवडणुकीतील पराभवावरून केलेल्या फडणवीसांच्या टीकेला राऊतांनी "तुम्ही ब्रँड नाही तर ब्रँडी आहात" असे म्हटले.

मुंबईतील भाजपच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी बेस्ट निवडणुकीत ठाकरे पॅनेलचा पराभव हा “ठाकरे ब्रँडचा बँड वाजल्यासारखा” असल्याचे म्हटले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी फडणवीस यांना “तुम्ही ब्रँड नाही तर ब्रँडी आहात” असे प्रत्युत्तर दिले. राउत यांनी बेस्ट निवडणुकीत मतदानाच्या घोटाळ्याचा आरोपही फडणवीसांवर केला. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत आनंद दिघे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो असल्याने त्यावरही राउत यांनी टीका केली. त्यांनी या फोटोला बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.

Published on: Sep 19, 2025 10:27 AM