Sanjay Raut Press | अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर; बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असून सुनेत्रा पवार या त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांचे सहकारी होते, मात्र नव्या संघटनात्मक रचनेत ते सुनेत्रा पवार यांचे सहकारी असतीलच असे नाही. तसेच, दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्याची गरज काय?, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांबाबत त्यांनी कोणाला कोणती पदे दिली, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, पुढील काळात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल, तसेच शिंदे गटातील काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
