Sanjay Raut : असा पुरूष सिंह होणे नाही.. ज्यांच्यामुळे मी घडलो… राऊतांकडून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना

Sanjay Raut : असा पुरूष सिंह होणे नाही.. ज्यांच्यामुळे मी घडलो… राऊतांकडून बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना

| Updated on: Nov 17, 2025 | 1:04 PM

संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे, त्यांना असा पुरुष सिंह होणे नाही असे म्हटले आहे. बघा काय केले ट्वीट?

खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देताना, “ज्यांच्यामुळे मी घडलो, असे एकमेव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. असा पुरुष सिंह होणे नाही. मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे, हीच त्यांना आदरांजली,” असे ट्विट करत म्हटले आहे.

तर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवरील नियुक्त्यांवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्यातील चर्चेनंतर या वादावर पडदा पडला. एकनाथ शिंदे यांच्या आग्रहानंतरही, उद्धव ठाकरे यांनी पक्षफुटीनंतर गेलेल्या आमदारांना समितीमध्ये घेण्यास विरोध केला होता. परिणामी, कट्टर शिवसैनिक शिशिर शिंदे यांना देवेंद्र फडणवीसांकडून संधी देण्यात आली.

Published on: Nov 17, 2025 01:04 PM