संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर शिवसेनेच्या खटल्यात दिरंगाईचा आरोप

संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर शिवसेनेच्या खटल्यात दिरंगाईचा आरोप

| Updated on: Jan 25, 2026 | 12:24 PM

संजय राऊत यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर शिवसेना प्रकरणी साडेतीन वर्षांपासून सुनावणी प्रलंबित असल्याचा आरोप केला आहे. न्यायमूर्तींनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार स्वीकारणे आणि त्यांना भेटणे हे घटनाबाह्य व अनैतिक असल्याचे राऊत म्हणाले. या प्रकारामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा खटला गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असून, न्यायमूर्तींकडून तारखांवर तारखा दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राऊत यांच्या मते, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मुंबई दौऱ्यावर असताना, या खटल्यातील एक पक्षकार असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडून विमानतळावर सत्कार स्वीकारला आणि नंतर त्यांना भेटले. हे कृत्य संविधानाच्या विरुद्ध, घटनाबाह्य आणि अनैतिक असल्याचे राऊत म्हणाले. यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. जस्टिस डिले, जस्टिस डिनाईड या न्यायामूर्तींच्याच वक्तव्याचा संदर्भ देत, राऊत यांनी न्याय मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Published on: Jan 25, 2026 12:24 PM