Sanjay Raut | वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी असते तरी मी खुर्ची दिली असती, टीकेनंतर राऊतांचं स्पष्टीकरण

| Updated on: Dec 09, 2021 | 12:59 PM

लालकृष्ण आडवणी असते तिथं तर त्यांना खुर्ची दिली असती. शरद पवार यांचं वय, पवार साहेबांना होणार त्रास, आम्ही जसं मांडी घालून बसतो तसं त्यांना बसता येत नाही. महाराष्ट्रातल्या पितृतुल्य वडिलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली ते जर कुणाला आवडलं नसेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृती नसून विकृती असल्याचं संजय राऊत म्हणाले.

Follow us on

लालकृष्ण आडवणी असते तिथं तर त्यांना खुर्ची दिली असती. शरद पवार यांचं वय, पवार साहेबांना होणार त्रास, आम्ही जसं मांडी घालून बसतो तसं त्यांना बसता येत नाही. महाराष्ट्रातल्या पितृतुल्य वडिलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली ते जर कुणाला आवडलं नसेल तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृती नसून विकृती असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्या ठिकाणी लालकृष्ण आडवणी, अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंग, लालूप्रसाद यादव यांना त्रास असता आणि ते तिथं आले असते तरी त्यांना खुर्ची आणून दिली असती. राजकीय विरोधक असले ती हे सर्व पितृतुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. मला माहिती आहे कुणाच्या काय वेदना आहेत. कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही.

ज्यांनी आडवाणी साहेबांना उभं राहू दिलं नाही, खुर्चीचा विषय सोडाच त्यांनी यासदंर्भात विचारु नाही, असं संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे माझे गुरु आहेत. त्यांनीच मला संस्कार दिले आहेत. यशवंतराव चव्हाण माझे आदर्श आहेत.  हा संस्कार आणि संस्कृती मोठ्यांचा आदर करणे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं बंद करा. ही विकृती आहे, असं जर वागत राहिलात तर महाराष्ट्रात तुमचं सरकार कधी येणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं आहे.