मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीने सक्षम: संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि विकासाला गती देण्याच्या दृष्टीने सक्षम: संजय राऊत

| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Jun 26, 2021 | 4:36 PM

मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.

पक्षप्रमुख हे मुख्यमंत्री आहेत. आज माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संघटनात्मक बांधणीबाबत झाली. संघटना बळकट असेल तर सरकार आहे त्यापेक्षा मजबूत होईल, सरकारी प्रदीर्घ काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. त्यासाठी संघटनात्मक चर्चा झाली. अनेक विषय महाराष्ट्रात सुरु आहे, मुख्यमंत्री रिलॅक्स आहेत, विधानसभा अधिवेशनाची त्यांची तयारी सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले.
दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा चर्चा होते. आज पक्षप्रमुख आणि मी कार्यकर्ता म्हणून भेटलो. त्यावेळीही राजकीय चर्चा होते. त्यामध्ये बाहेर चर्चा व्हावी असं काही नाही. सर्वकाही सुरळीत आहे. मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या, ढोल बडवले, तरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याची खात्री देतो, असा दावा संजय राऊत यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us