Saamana :  फडणवीसांना ‘हा’ माणूस गोत्यात आणणार? भाजप हीच एक रेव्ह पार्टी अन् त्याचा सूत्रधार… ‘सामना’तून भाजपवर घणाघात

Saamana : फडणवीसांना ‘हा’ माणूस गोत्यात आणणार? भाजप हीच एक रेव्ह पार्टी अन् त्याचा सूत्रधार… ‘सामना’तून भाजपवर घणाघात

| Updated on: Jul 29, 2025 | 10:56 AM

पुण्यात कधीकाळी संस्कार, संस्कृती व नैतिकतेचे 'अजीर्ण' झाले होते. आज नेमके उलटेच घडत आहे. सर्वच बाबतीत वाटोळे झाल्याचे दिसते. सत्तेचे, पैशांचे, अनैतिकतेचे बेफाम वारे या माणसाच्या डोक्यात शिरले आहे. हे घातक असल्याचे सामनातून म्हटलंय.

पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर नुकताच पोलिसांकडून छापा घालण्यात आला. या पार्टीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटकही केली आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाथाभाऊंच्या जावयाचा रेव्ह पार्टीत सहभाग असल्याने राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसताय. अशातच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावरून टीकास्त्र डागण्यात आलंय. यावेळी सामनातून भारतीय जनता पार्टी आणि भाजपवर गंभीर आरोप करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. इतकंच नाहीतर भाजप हीच एक रेव्ह पार्टी बनली असून या रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे.

‘भारतीय गुंडा, बलात्कारी पार्टीला नैतिकतेची उबळ आली की, विरोधकांवर धाडी टाकायच्या व आपला नैतिकतेचा कंडू शमवायचा. ज्या प्रकारचे गुंड, भ्रष्ट, अनैतिक लोक भाजपमध्ये घेतले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना रेव्ह पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन हा माणूस गोत्यात आणू शकतो.’, असं सामनातून म्हटलंय.

Published on: Jul 29, 2025 10:56 AM