Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं… व्हिडीओ तुफान व्हायरल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’च्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

‘इडियट’ हा असंसदीय शब्द नसल्याचे सांगत राऊत म्हणाले, “या देशात थ्री इडियट नावाचा सिनेमा आला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मोदी म्हणाले, तो सिनेमा पाहा.” भारतीय राजकारणातील ‘थ्री इडियट्स’ कोण आहेत, हे सर्वांना माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले.
राऊत यांनी पुढे भाजपवर निशाणा साधत, “एक इडियट महाराष्ट्रात आहे. दोन केंद्रात आहेत,” असे विधान केले. वंदे मातरमच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. “ज्यांना वंदे मातरमचा इतिहासच माहीत नाही. तुम्ही आधी माफी मागा,” असे ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. रोज पेपर फुटत असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकारच्या कामकाजावरही टीका केली. लालकिल्ल्यावर टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याचा उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरही सवाल उपस्थित केला.