संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; कन्येच्या लग्नाचं दिलं निमंत्रण
Sanjay Raut meets Raj Thackeray

संजय राऊतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट; कन्येच्या लग्नाचं दिलं निमंत्रण

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 2:43 PM

राऊत आणि राज ठाकरे यांच्यात राजकारणापलिकडे कौटुंबीक संबंध आहेत. तब्बल वर्षभरानंतर या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली. कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास गप्पा झाल्या.यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास गप्पा झाल्या. राऊत आणि राज ठाकरे यांच्यात राजकारणापलिकडे कौटुंबीक संबंध आहेत. तब्बल वर्षभरानंतर या दोन्ही नेत्यांची भेट होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र्’ केल्यानंतर जवळपास 16 वर्षांनी संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी आले होते.राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र्’ केल्यानंतर जवळपास 16 वर्षांनी संजय राऊत त्यांच्या निवासस्थानी आले होते.