Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं

Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं

| Updated on: Jul 02, 2026 | 11:14 AM

राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असतानाच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यात "ऑपरेशन कमळ"सारख्या राजकीय घडामोडी भाजपलाही अनुभवाव्या लागू शकतात, असा इशारा दिला.

राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होत असतानाच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यात “ऑपरेशन कमळ”सारख्या राजकीय घडामोडी भाजपलाही अनुभवाव्या लागू शकतात, असा इशारा दिला.

संजय राऊत म्हणाले की, आज इतर पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना भविष्यात त्याच परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. “एक दिवस तुमचंच ऑपरेशन होईल आणि तेव्हा कळणारही नाही. ऑपरेशन कमळ होईल,” असे वक्तव्य त्यांनी केले.

आपल्या वक्तव्यांवरून सातत्याने टीका होत असल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “मी बोललो की म्हणतात संजय राऊत शिव्या देतो. पण ज्यांना जी भाषा समजते, त्यांच्याशी त्याच भाषेत बोलावे लागते.”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अलीकडील वक्तव्याचाही संदर्भ देत त्यांनी सध्याच्या राजकीय वास्तवावर भाष्य केले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, शिवसेनेने आमदार आणि खासदारांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जपले, मात्र त्यांनी राजकीय स्वार्थासाठी पक्षाची साथ सोडली.

यावेळी त्यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत, “आज इतर पक्ष फोडले जात आहेत, पण उद्या फोडण्यासाठी कोणी उरणार नाही, तेव्हा मोदी-शहा यांनाच स्वतःचा पक्ष सांभाळावा लागेल,” असा टोला लगावला.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, त्यांच्या आरोपांवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 02, 2026 11:14 AM
Follow Us