VIDEO : Sanjay Raut | कोरोना निर्बंधांमुळे संजय राऊत यांचा पुणे दौरा रद्द
राज्यामध्ये वाढलेली कोरोनाची रूग्ण संख्या यामुळे कोरोनासंदर्भात नियम हे कडक करण्यात आले आहेत. कोरोना निर्बंधांमुळे संजय राऊत यांचा पुणे दौरा रद्द केला आहे. राज्यात 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने अतिरिक्त निर्बंध काय असतील, याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यामध्ये वाढलेली कोरोनाची रूग्ण संख्या यामुळे कोरोनासंदर्भात नियम हे कडक करण्यात आले आहेत. कोरोना निर्बंधांमुळे संजय राऊत यांचा पुणे दौरा रद्द केला आहे. राज्यात 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने अतिरिक्त निर्बंध काय असतील, याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.
