Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Oct 30, 2026 | 1:48 PM

संजय राऊत यांनी त्यांच्या बोध कीर्तन या नव्या पुस्तकातून विजय मल्ल्यांबाबत मोठा दावा केला आहे. मल्ल्या कधीच फ्रॉड नव्हते आणि त्यांना लोक भगोडे म्हणतात हे आपल्याला पटत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. मोदी सरकारनेच त्यांना देश सोडायला भाग पाडले, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आगामी बोध कीर्तन या पुस्तकातून उद्योगपती विजय मल्ल्यांबाबत खळबळजनक दावे केले आहेत. विजय मल्ल्या कधीच फ्रॉड नव्हते आणि त्यांना भगोडे म्हणणे आपल्याला मान्य नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

राऊत यांच्या माहितीनुसार, त्यांच्या बोध कीर्तन या पुस्तकातील माल्ल्याची गोष्ट या प्रकरणात त्यांनी विजय मल्ल्यांसोबतचे आपले अनुभव आणि त्यांच्यावरील आपले मत मांडले आहे. राऊत आणि मल्ल्या संसदेत सहकारी होते आणि त्यांच्यात संवाद होता. मल्ल्यांनी बँकांकडून कर्जे घेतली असली तरी, उद्योग कोसळल्यानंतर त्यांनी केवळ सहकार्याची अपेक्षा केली होती, कर्जमाफीची नाही, असे राऊत सांगतात. परंतु, मोदी सरकारच्या धोरणांमुळेच त्यांना देश सोडावा लागला, असा दावा राऊत यांनी केला आहे. मुंबईत होणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि अंबरीश मिश्र उपस्थित राहणार आहेत.

Published on: Oct 30, 2026 1:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us