Sanjay Shirsat : ही सगळी नाटकं… नॉनव्हेज बॅन अन् जलीलांकडून मुख्यमंत्र्यांना बिर्याणी खाण्याचं निमंत्रण, शिरसाटांनी फटकारलं
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महापालिकेने लागू केलेल्या मांसविक्री बंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनी आपल्याला बिर्याणीच खायची आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमधील महापालिकांकडून आज १५ ऑगस्ट निमित्त मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्री आणि कत्तलीवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या निर्णयानंतर खाटीक समाजासह काही राजकीय नेत्यांनी या आदेशाला विरोध करत नाराजी व्यक्त केली. अशातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना पार्टीचं निमंत्रण देत माझ्याकडे बिर्याणी खायला यावं, चिकन खुर्माची तयारी केली आहे असं वक्तव्य केलं होतं. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट म्हणाले, ‘ही सगळी नाटकं आहे. आपला TRP वाढवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार सुरू आहेत’, असं म्हणत संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधलाय. तर इम्तियाज जलील यांच्याकडून सुरू असणारे प्रकार जनतेच्या लक्षात येत असल्याचेही संजय शिरसाट यांनी म्हटलंय.
