बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन… संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा

बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार; चांदीचे कडं देऊन… संग्राम भंडारेंनी केली अजब घोषणा

| Updated on: Sep 06, 2026 | 10:17 AM

संग्राम भंडारे यांनी विद्यानंद बापट यांना चापट मारणाऱ्या संतोष चव्हाणला चांदीचे कडं देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. संतोष चव्हाणमुळेच विद्यानंद बापट आपल्याला माहित झाल्याचे भंडारे यांचे म्हणणे आहे. यावर, "हे प्रसिद्धीसाठीचे माकडचाळे असून, मला कार्यसिद्धी महत्त्वाची आहे," असे म्हणत विद्यानंद बापटांनी या घटनेला कमी लेखले आहे.

पुण्यात विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणला चांदीचे कडं देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणा संग्राम भंडारे यांनी केली आहे. संतोष चव्हाणमुळेच विद्यानंद बापट आपल्याला माहित झाल्याचे भंडारे यांचे म्हणणे आहे. या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी टीव्ही नाईन मराठीशी बोलत असताना संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला होता. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.

या घटनेनंतर आता संग्राम भंडारे यांनी संतोष चव्हाणचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विद्यानंद बापट यांनी अशा प्रकारच्या कृत्यांना प्रसिद्धीसाठीचे माकडचाळे म्हटले आहे. “मला कार्यसिद्धी महत्त्वाची आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी सवंग प्रसिद्धीसाठी कुणीही काहीही करत असल्याचे नमूद केले. संबंधित यंत्रणा असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करतील, असेही त्यांनी म्हटले आहे

Published on: Sep 06, 2026 10:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us