Satara | सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं, अधीक्षकांना सक्तीची रजा
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना रजेवर राहावे लागणार आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना रजेवर राहावे लागणार आहे. दरम्यान, चौकशी कालावधीत सातारा पोलीस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या राडा प्रकरणामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या घटनेचा फटका थेट पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पुढील कारवाई काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 30, 2026 05:50 PM
Follow Us
