Jayant Patil | दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

| Updated on: Mar 04, 2026 | 1:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचं विलीनीकरण होईल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर ही चर्चा अधिक सुरू होती. अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली जात होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचं विलीनीकरण होईल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. विशेषतः उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर ही चर्चा अधिक सुरू होती. अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या, दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली जात होती. अजित पवार हयात असताना विलिनीकरणासाठी काही पावले उचलली गेली होती. 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार होती आणि त्यानंतर पक्षाची सर्व जबाबदारी अजित पवारांकडे सुपूर्त केली जाणार होती, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात होता. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांकडून यावर प्रत्यक्षात काही प्रतिक्रिया आलेली नव्हती. अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाबाबत कोणतीही पुढील चर्चा होत नव्हती आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अद्यापही मौन बाळगले आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की, “आता दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार नाही. ज्यांच्यासोबत ही चर्चा सुरू होती, ते अजित पवार आता हयात नाहीत. त्यामुळे हा विषय आता पूर्णपणे बंद झाला आहे.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून भविष्यात काय घडेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Mar 04, 2026 01:40 PM
Follow Us