NCP Ram Khade : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, बीडमध्ये चाललंय काय?

Updated on: Nov 27, 2025 | 10:53 AM

बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर-बीड सीमेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. १० ते १५ हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला, ज्यात राम खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी दोन प्रमुख राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, बीड जिल्ह्यातील अहिल्यानगर-बीड सीमेलगतच्या मांदगावजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. १० ते १५ अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात येणार आहे.

या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, मेहबूब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम खाडे अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे बाहेर काढत आहेत. आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळ्यासह अनेक मोठे घोटाळे त्यांनी उघड केले होते. विशेष म्हणजे, न्यायालयाने राम खाडे यांना सुरक्षा पुरवली होती, अशीही माहिती मेहबूब शेख यांनी दिली आहे.

Published on: Nov 27, 2025 10:53 AM