Rohit Pawar : रोहित पवारांनी मानले राणेंचा आभार, मित्रपक्षाच्याच आमदारानं टराटरा फाडले कपडे; भाजपनं नाकाने कांदे सोलण्याचे धंदे…
भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल रोहित पवारांनी निलेश राणेंचे आभार मानले आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप वारेमाप पैशाचा वापर करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यांचे पाय चिखलात माखलेले असल्याचेही ते म्हणाले.
भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल रोहित पवारांनी भाजपचे नेते निलेश राणेंचे आभार मानले आहेत. मालवणमध्ये निलेश राणेंनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकल्यानंतर रोहित पवारांनी हे विधान केले. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप वारेमाप पैशाचा वापर करत असल्याचा आरोप करत, भाजपचे पाय केवळ मातीतच नाही तर चिखलातही माखलेले असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. “पार्टी विथ डिफरन्स” म्हणवून घेणाऱ्या भाजपने आपले पाय पूर्णपणे चिखलात माखले आहेत, हे मान्य करावे, असेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले.
असं आहे रोहित पवारांचं ट्वीट
निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आ. निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे.. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं.