Sanjay Raut | क्लोजर रिपोर्टनंतर राजकीय वाद पेटला; राऊतांचे थेट आरोप

Sanjay Raut | क्लोजर रिपोर्टनंतर राजकीय वाद पेटला; राऊतांचे थेट आरोप

| Updated on: Feb 28, 2026 | 11:42 AM

शिखर बँक घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. मात्र आता या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (EOW) अहवालाला विशेष न्यायालयाने मान्यता दिली आहे. या अहवालात सर्व संबंधित राजकीय नेत्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राऊत म्हणाले, क्लोजर रिपोर्ट करावाच लागेल, कारण त्या आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावेत म्हणून अजित पवारांसह 40 लोकं हे भाजपच्या वळचणीला गेले. पण अजित पवार असताना क्लोजर रिपोर्ट झाला नाही. अजित पवार असताना जरंडेश्वर साखर कारखान्याचा विषय बंद झाला नाही. हा रिपोर्ट क्लोज करावा असा शेरा देत ही फाईल दिल्लीला गेली. पण, त्यावर नव्याने चौकशी करा, असा केंद्रीय सहकार मंत्रालयाचा शेरा मारून अमित शहांनी ती फाईल परत पाठवल्यामुळे अजित पवार अस्वस्थ होते. त्यातूनच त्यांना परत माघारी जायचं होतं. ज्या कारणासाठी मी भाजपसोबत आलो, ती फाईलच बंद होत नसेल तर कशासाठी थांबायचं असं त्यांना वाटत होतं, असा दावा राऊतांनी केला.

Published on: Feb 28, 2026 11:42 AM
Follow Us