मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी… राजकारणात मोठं घडतंय?

मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी… राजकारणात मोठं घडतंय?

| Updated on: Jun 25, 2026 | 1:22 PM

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या बंडखोर खासदारांमध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी बंडखोरी करत स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या बंडखोर खासदारांमध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे. त्यांच्या निर्णयामुळे ईशान्य मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वाद आता अधिकच तीव्र झाला आहे. संजय राऊत यांनी फुटीर खासदारांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर संजय दिना पाटील यांनीही राऊतांवर वारंवार निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीबाबत संजय दिना पाटील यांनी खळबळजनक विधान केल्याचं सांगितलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार आणि आमदारांना वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाची बदनामी होईल अशी विधाने करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता संजय दिना पाटलांनी असं काही नाही उलट त्यांनी मला शाबासकी दिली असं वक्तव्य केलं आहे.

Published on: Jun 25, 2026 1:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us