Special report | रखरखत्या उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा अट्टहास का? १४ कोटी खर्च तरीही श्रीसेवकांची अबाळ

Special report | रखरखत्या उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा अट्टहास का? १४ कोटी खर्च तरीही श्रीसेवकांची अबाळ

| Updated on: Apr 18, 2023 | 8:28 AM

VIDEO | महाराष्ट्र भूषण पुरस्काराला उष्माघाताचं गालबोट, विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराला उष्माघाताचं गालबोट लागलंय. नवी मुंबईतील खारघरच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्यात हजर असलेल्या १३ श्रीसेवकांना उष्माघातानं आपला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या १३ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? रखरखत्या उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा अट्टहास का? असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. ४२ डिग्री तापमानात भर दुपारी कडक उन्हात सरकारने हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात मंत्र्यांसाठी भलं मोठं शेड, कुलर आणि पंखे होते मात्र या सोहळ्यासाठी आलेल्या लोकांसाठी आभाळ उघडं होतं. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यानं अनेकांचे जीव गेले. तरीही अद्याप अनेकांवर उपचार सुरू आहेत. मात्र ज्या पद्धतीने सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्यावर विरोधकांकडूनही प्रश्न उपस्थित होत आहेत. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 18, 2023 08:17 AM