एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात…

एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात…

| Updated on: Jul 02, 2026 | 9:59 AM

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून ठाकरे गट आणि शिंदे गटामधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काल नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले.

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून ठाकरे गट आणि शिंदे गटामधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काल नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हा विरोध दर्शवला होता. राज्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा करत शिवसैनिकांना “ऑपरेशन तुडवा” सुरू करण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर काही ठिकाणी फुटीर खासदारांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी काळा झेंडा दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना शाबसकी दिली. यानंतर खासदार नागेश आष्टिकर संतापले.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटात सामिल झालेले खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. “दाखवा ते काळे झेंडे वगैरे काय ते, आम्हाला तुमचं काही माहित नाही का? अरे नसानसातल्या गोष्टी माहित आहेत, मग बघा आम्हीसुद्धा आहोत, तुम्ही सुद्धा या बघा काय होतंय ते,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सेनेला प्रत्युत्तर दिले.

Published on: Jul 02, 2026 9:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us