सी व्होटर सर्व्हेवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली, भाजप-शिंदे गटाची चिंता वाढवणारा काय आहे सर्व्हे?

| Updated on: Jan 28, 2023 | 10:01 AM

२०२४ च्या लोकसभेत मविआला मोठा फायदा तर भाजप आणि शिंदे गटाला मोठा फटका बसणार?

Follow us on

नुकताच सी व्होटरचा सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सी व्होटरचा सर्व्हेने भाजप आणि शिंदे गटाची चिंता चांगलीच वाढवली आहे. कारण लोकसभेत महाविकास आघाडीला ३४ जागा तर भाजप आणि शिंदे गटाला १४ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला २०२४ च्या लोकसभेत मोठा फायदा होणार असून भाजप आणि शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सी व्होटरचा सर्व्हे जाहीर झाल्यानंतर यामध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सी व्होटरचा हा सर्व्हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची चिंता वाढवणारा असल्याचे म्हटले जात आहे.