Ashok Kharat | भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात! आता शिर्डी पोलीस खरातचा ताबा मागणार, कारण…
भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार शिर्डी पोलीस अशोक खरातचा ताबा मागणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...
भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार शिर्डी पोलीस अशोक खरातचा ताबा मागणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या…
शिर्डी पोलिस आज राहता न्यायालयात खरात संबंधित अर्ज दाखल करणार आहेत. लवकरात लवकर भोंदूचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलीस प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात अशोक खरात मुख्य आरोपी आहे. या प्रकरणातील दोन आरोपी आधीच अटकेत आहेत तर कल्पना खरात अद्याप फरार आहे. जमीन गैरव्यवहार, बनावट खाती तसेच फसवणुकीच्या चौकशीसाठी शिर्डी पोलीस अशोक खरातचा ताबा घेतील. एकूणच अशोक खरातच्या काळ्या कृत्याविषयी आणखी माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.
Published on: Apr 08, 2026 02:37 PM
Follow Us
