शिवसेना खासदार Sanjay Raut जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा, पाहा व्हिडिओ

| Updated on: May 07, 2022 | 1:07 AM

संजय राऊत आज पुण्यात थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी जोरदार (शाब्दिक) फटकेबाजी केली. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो, आज मैदानावरही केली, असं संजय राऊत म्हणाले.

Follow us on

YouTube video player

पुणे : राजकारणाच्या पिचवर शिवसेनेची किंबहुना महाविकास आघाडीची खिंड भक्कमपणे लढवताना आपण शिवसेना खासदार संजय राऊतांना नेहमी पाहतो. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची होणारी कोंडी असेल, संजय राऊत महाविकास आघाडीचे ओपनर बॅट्समन राहिले! भाजपसह सर्वच विरोधकांना वार ते सहजतेनं स्वीकारतात आणि त्याच तडफेनं परतवूनही लावतात. हेच संजय राऊत आज पुण्यात थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. त्यावेळी त्यांनी जोरदार (शाब्दिक) फटकेबाजी केली. मैदान हे मैदान असतं मग ते कुठलंही असो. राजकारणातही बॅटिंग करत असतो, आज मैदानावरही केली, असं संजय राऊत म्हणाले.