Sushma Andhare | सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग

Sushma Andhare | सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग

| Updated on: May 11, 2026 | 10:30 AM

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज हक्कभंग प्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 वाजता त्या हक्कभंग कारवाईला सामोरे जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सुषमा अंधारे या सुनावणीसाठी उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता त्या प्रत्यक्ष विधिमंडळात हजर राहून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हक्कभंग प्रकरणात नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार आणि अंधारे यांच्याकडून काय स्पष्टीकरण दिले जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्येही हालचाली वाढल्या आहेत. आजच्या कारवाईनंतर या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published on: May 11, 2026 10:30 AM
Follow Us