Special Report | शिवसेना महिला आघाडी विरुद्ध भाजपची महिला आघाडी
शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.
मुंबई : मुंबईतल वरीळीत काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात आतापर्यंत एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका 4 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या स्फोटांच्या दुर्घटनेनंतर भाजपने आक्रमक होतं महापौरांवर टीकेची झोड उडवली. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महापौरावर टीका केली, मात्र शेलारांच्या या टीकेवरून आता प्रकरण तापलं आहे. शेलारांच्या टीकेवर महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक आल्या आहेत. त्यावरून त्यांनी तक्रार केली आहे.
किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र
मुंबईतल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नायर रुग्णालयात रुग्णांन तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौरांवर टीका करताना. महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? 72 तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, 72 तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.
