Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले…

Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले…

| Updated on: Sep 13, 2026 | 4:24 PM

शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणाले, तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारे आरक्षण आवश्यक आहे. सरकारने कायदेशीर आणि तांत्रिक बाबी विचारात घेऊन निर्णय घ्यावा, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. हैदराबाद गॅझेट कोर्टात टिकल्याचे उदाहरण देत त्यांनी आरक्षणाची कायदेशीर बाजू मजबूत करण्यावर भर दिला.

मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारे आरक्षण आवश्यक आहे, असे ते म्हणाले. शासनाची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका सकारात्मक असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अनेकदा त्यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेटच्या संदर्भातही त्यांनी माहिती दिली. हैदराबाद गॅझेटला कोर्टात आव्हान मिळाले होते, परंतु ते देवेंद्र फडणवीस यांच्या कायदेशीर प्रयत्नांमुळे टिकले. आता दोन्ही गॅझेट लागू करताना एक कोर्टात टिकले आणि दुसरे रद्द झाले, असे होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोणताही निर्णय घाईघाईने घेतल्यास तो कोर्टात आव्हानला जातो आणि रद्द होण्याची शक्यता असते. यामुळे एकदा मिळालेले आरक्षण जर गमावले, तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अर्थ राहणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना शासनाने सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा सखोल विचार करावा. या प्रक्रियेत जरांगे पाटील यांनी शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटील हेही या संदर्भात प्रयत्न करत असून, योग्य कायदेशीर बाजू पाहून शंभर टक्के निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Published on: Sep 13, 2026 4:24 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us