Thane | Maharashtra Band | ठाण्यात उपमहापौरांच्या पतीकडून रिक्षा चालकाला मारहाण, व्हिडीओ समोर

| Updated on: Oct 11, 2021 | 3:23 PM

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Follow us on

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे स्थानिक नेते महाराष्ट्र बंदवेळी रिक्षाचालकांना मारहाण करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात उपमहापौरांचे पती पवन कदम हे रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत!

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर आज सकाळपासूनच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरले होते. ठाण्यात उपमहापौर यांचे पती पवन कदम आणि काही सहकाऱ्यांसह महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग घेतला. मात्र, त्यावेळी रिक्षा वाहतूक सुरु असल्याचं पाहून त्यांनी रिक्षाचालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने तर हातात काठी घेत येणाऱ्या प्रत्येक रिक्षाचालकांना मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. पवन कदम यांनीही एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती लागलाय.