Pratap Sarnaik : भिवंडी काय आझमींच्या बापाची आहे का? शिवसेनेच्या मंत्र्यानं झापलं

Pratap Sarnaik : भिवंडी काय आझमींच्या बापाची आहे का? शिवसेनेच्या मंत्र्यानं झापलं

| Updated on: Oct 01, 2025 | 6:42 PM

भिवंडीत मराठीच्या गरजेविषयी अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी "भिवंडी काय आझमींच्या बापाची आहे का?" असा संतप्त सवाल केला आहे. मनसेनेही आक्रमक पवित्रा घेत, मराठीची लाज वाटणाऱ्यांना मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

भिवंडी महाराष्ट्रात असूनही तिथे मराठी भाषेची काय गरज, अशा आशयाचे वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केल्याने नवा राजकीय वाद उफाळला आहे. भिवंडीत मराठीमध्ये प्रतिक्रिया देण्यास आझमींनी नकार दिल्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला. आझमींच्या या भूमिकेवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे का?” असा सवाल करत सरनाईक यांनी आझमींवर टीका केली. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल, तर त्यांना मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे. महाराष्ट्रात राजकारण करताना उत्तर प्रदेशाच्या भाईयांची पर्वा कशाला, असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला. भिवंडी महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून इथे मराठीच चालणार, असे मनसेने स्पष्ट केले.

Published on: Oct 01, 2025 06:42 PM