Nilesh Rane : नंबर नसलेली कार अन् ‘कमळा’चा स्कार्फ.. भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड… निलेश राणे यांच्या नव्या आरोपानं खळबळ

Nilesh Rane : नंबर नसलेली कार अन् ‘कमळा’चा स्कार्फ.. भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत रोकड… निलेश राणे यांच्या नव्या आरोपानं खळबळ

| Updated on: Dec 02, 2025 | 5:51 PM

रत्नागिरी स्थानिक स्वराज्य निवडणूक २०२५ पूर्वी मालवण पिंपळपारमध्ये तपासणीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत दीड लाखांची रोकड आढळल्याचा आरोप निलेश राणेंनी केला आहे. पोलिसांकडून कारवाई न झाल्याबद्दल राणेंनी संताप व्यक्त करत, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी स्थानिक स्वराज्य निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मालवण पिंपळपार येथे तपासणीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत दीड लाखांची रोकड आढळल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची ही कार असल्याचा दावा राणेंनी केला आहे. तपासणीवेळी गाडीला नंबर प्लेट नव्हती आणि आतमध्ये भारतीय जनता पक्षाचा स्कार्फ ठेवलेला होता, असेही निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर निलेश राणे यांनी रात्री उशिरा मालवण पोलीस ठाण्यात हजेरी लावली. रोकड आढळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी, राणेंनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निलेश राणेंच्या मते, पोलिसांनी योग्यप्रकारे गुन्हा दाखल केलेला नाही आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी विजय केनवडेकर यांच्या घरी पैसे आढळल्याच्या प्रकरणात निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला होता, त्याचा संदर्भ देत, पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर राणेंनी बोट ठेवले. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.

Published on: Dec 02, 2025 05:51 PM